Posts

अश्वपती

Image
रामायणातील महत्वाची पण कमी माहितीतील पात्र  अश्वपती  -  डॉ. अलोक पवार कैकय देशाचा राजा - अश्वपती. घोड्यांचा देव असल्याने त्याचे नाव अश्वपती असे होते. इंद्र सुद्धा युद्धामध्ये त्याची मदत घ्यायचा अशी त्याची ख्याती होती. जर सध्याची युद्ध बघितली तर त्यामध्ये घोडे वापरले जातात. पूर्वीपासूनच युद्धांमध्ये घोड्यांना महत्वाचे स्थान दिले गेले आहे. घोड्यांच्या मदतीने जेंव्हा युद्ध होते तेंव्हा आपण शत्रूच्या स्थानावर त्वरितच पोहचू शकतो , या उद्देशाने घोड्यांना युद्धामध्ये विशेष स्थान दिले गेले आहे. घोड्यावर स्वार होऊन एका स्थानावरून दुसऱ्या स्थानावर   घोडा जेंव्हा जातो तेंव्हा त्यावर आसनस्थ घोड्याची दिशा निश्चिती करतो. आसनस्थ व्यक्तीचा भार सहन करून घोड्याला धावावे लागते.  यासाठी घोड्यांची निगराणी करणे, त्यांचा खुराक व्यवस्थित ठेवणे. युद्धाच्या वेळी कोणाला कोणता घोडा देणे, याचे प्रभावी कौशल्य ज्याला असावे लागते, असा तो अश्वपती. या अश्वपती राजाला एकूण सात मुले आणि एक मुलगी. एकुलती एक मुलगी लाडाची असल्याने तिला कैकय देशाचे नाव प्रदान केले जाईल या विचाराने कैकयी असे ठेवण्यात आल...

सुमित्रा

Image
  रामायणातील महत्वाची पण कमी माहितीतील पात्र  सुमित्रा -  डॉ. अलोक पवार हिंदू धर्मातील ग्रंथांमध्ये रामायण हा ग्रंथ अतिशय महत्वाचा आहे. त्यामध्ये रामाच्या जन्मापासून अगदी उत्तरकांड सर्वच गोष्ट भेटते. यामध्ये राम आणि काही ठराविक पात्रे सोडली तर बाकीची पात्रे अतिशय महत्वाची असूनही बऱ्याच जणांना काही पात्रांच्या विषयी फारच थोडे माहिती आहे. आज आपण यातलेच एक महत्वाचे पात्र पाहणार आहोत, सुमित्रा.. सुमित्रा म्हणजे रामाची सावत्र आई. लक्ष्मणाची आई. आज याच लक्ष्मणाच्या आई विषयी आपण माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.  जर एकाच राजाला एकापेक्षा जास्त राण्या असतील तर मोठी राणी असेल तिला मोठा दर्जा दिला जातो. तिला पट्टराणी असे देखील म्हणले जाते. राजा दशरथ याची मोठी आणि पहिली बायको म्हणजे कौशल्या. राणी कैकयी ही दशरथाची आवडीची राणी होती कारण तिने दशरथाचा एका युद्धात जीव वाचवला होता. कैकयी ही राहताना देखील महालात दशरथ यांच्यासोबत रहायची. सुमित्रा ही मात्र तिचा आश्रय तिची सवत कौशल्या हिच्यासोबत रहायची. कौशल्या, सुमित्रा आणि कैकयी या एकमेकीच्या जरी सवती असल्या तरी त्यांच्यात विशेष प्रे...