अश्वपती
रामायणातील महत्वाची पण कमी माहितीतील पात्र
अश्वपती
- डॉ. अलोक पवार
कैकय देशाचा राजा - अश्वपती. घोड्यांचा देव असल्याने त्याचे नाव अश्वपती असे होते. इंद्र सुद्धा युद्धामध्ये त्याची मदत घ्यायचा अशी त्याची ख्याती होती. जर सध्याची युद्ध बघितली तर त्यामध्ये घोडे वापरले जातात. पूर्वीपासूनच युद्धांमध्ये घोड्यांना महत्वाचे स्थान दिले गेले आहे. घोड्यांच्या मदतीने जेंव्हा युद्ध होते तेंव्हा आपण शत्रूच्या स्थानावर त्वरितच पोहचू शकतो, या उद्देशाने घोड्यांना युद्धामध्ये विशेष स्थान दिले गेले आहे. घोड्यावर स्वार होऊन एका स्थानावरून दुसऱ्या स्थानावर घोडा जेंव्हा जातो तेंव्हा त्यावर आसनस्थ घोड्याची दिशा निश्चिती करतो. आसनस्थ व्यक्तीचा भार सहन करून घोड्याला धावावे लागते. यासाठी घोड्यांची निगराणी करणे, त्यांचा खुराक व्यवस्थित ठेवणे. युद्धाच्या वेळी कोणाला कोणता घोडा देणे, याचे प्रभावी कौशल्य ज्याला असावे लागते, असा तो अश्वपती. या अश्वपती राजाला एकूण सात मुले आणि एक मुलगी. एकुलती एक मुलगी लाडाची असल्याने तिला कैकय देशाचे नाव प्रदान केले जाईल या विचाराने कैकयी असे ठेवण्यात आले.
सुमित्रा राणीची गोष्ट आपण ऐकलीच आहे. मात्र जेंव्हा राम, लक्ष्मण आणि सीता वनवासात जातात, तेंव्हा सुमित्रा आपल्या दोन्ही सुनांशी बऱ्याच गप्पा मारत बसायची. कैकयी राणी आधी कशी होती, ती मुळची कुठली आहे, हे सांगताना तिने आपल्या दोन्ही सुना म्हणजे उर्मिला आणि श्रुतकीर्तीला अश्वपतीची महत्वाची गोष्ट सांगितली.
राजा अश्वपती आणि राणी दोघेही राजमहालाच्या समोरच्या उद्यानात विहार करीत असतात. राजा अश्वपातीला एक वरदान प्राप्त झालेले असते की तो कोणत्याही पक्षाच्या मनात काय चालले आहे, ते काय बोलत आहेत हे समजू शकत होता. मात्र ते पक्षी काय बोलत आहेत, हे जर राजाने कोणाला सांगितले तर राजाचा मृत्यू होईल. राजा - राणीचा विहार चालू असताना तिथेच एक हंसाचे जोडपे पण असते. त्यांचे एकमेकांशी जे बोलणे चालू होते ते ऐकून राजा एकदम हसायला लागतो. त्या राजाला हसताना बघून राणीला देखील हंसांचे बोलणे नक्की काय चालू आहे, हे ऐकण्याची इच्छा झाली. ती राजाला काय बोलत आहेत हंस, मला पण सांगा अशी इच्छा व्यक्त करू लागली. राणीला राजाच्या वरदानाच्या विषयी माहिती होते. राजाने हंसांचे बोलणे राणीला सांगितले तर राजाचा मृत्यू होऊ शकतो हे माहिती असूनही ती राजाला आग्रह करत होती की तिला काय ते कळले पाहिजे. राजा सुरवातीला या गोष्टीवर नाराज झाला. पुढे मात्र राणीला आपल्या जीवाची काहीच पर्वा नाही हे लक्षात येताच राजाने राणीला माहेरी पाठवून दिले. आपली सातही मुले आणि कैकयी यांना सांभाळण्याची जवाबदारी ही एकट्या राजावर येऊन पडली.
मुलगी सांभाळण्याची जवाबदारी ही महत्वाची असते त्यामुळे, मंथरा नावाच्या दासीची नेमणूक करण्यात आली.
कैकयीचा विवाह जेंव्हा दशराथासोबत झाला, तेंव्हा अश्वपती राजाने कैकयीच्या मुलालाच राजा बनविण्याचा आग्रह धरला होता. आपल्या मुलीला सासरी गेल्यावर राणी झाली तरी काहीच कष्ट पडू नये म्हणून कैकयीच्या सोबत अश्वपती राजाने दासी मंथरा हिला पाठवले.
ही सर्व गोष्ट सुमित्रेने आपल्याला सुनेला सांगितल्याच कळते. हंसांचे बोलणे नक्की काय आहे, हे अद्याप कोणत्याच पुराणात, ग्रंथात किंवा पुस्तकात उपलब्ध नाही. काही दिवसांपूर्वी संजय नार्वेकर चा एक मराठी चित्रपट 'अग बाई अरेच्चा' आला होता कि सुरवातीला त्याला स्त्रियांच्या मनातले तर नंतर त्याला पक्षांच्या मनातले बोललेले ऐकू यायचे. कदाचित त्या चित्रपटाची पटकथा या अश्वपती राजाच्या आयुष्यावर आधारलेली दिसून येते. राजाने अगदी काळजीने कैकयीला सांभाळलेले दिसून येते. पुढे जाऊन कैकयीच्याच मुलाला राजा बनवा यातून राजाचे भविष्यचातुर्य दिसून येते. घोड्यांची सेना असल्याने युद्धामधील राजाची शक्ती पण किती अफाट आहे हे देखील दिऊन येते.
- डॉ. अलोक पवार



Comments
Post a Comment