अश्वपती
रामायणातील महत्वाची पण कमी माहितीतील पात्र अश्वपती - डॉ. अलोक पवार कैकय देशाचा राजा - अश्वपती. घोड्यांचा देव असल्याने त्याचे नाव अश्वपती असे होते. इंद्र सुद्धा युद्धामध्ये त्याची मदत घ्यायचा अशी त्याची ख्याती होती. जर सध्याची युद्ध बघितली तर त्यामध्ये घोडे वापरले जातात. पूर्वीपासूनच युद्धांमध्ये घोड्यांना महत्वाचे स्थान दिले गेले आहे. घोड्यांच्या मदतीने जेंव्हा युद्ध होते तेंव्हा आपण शत्रूच्या स्थानावर त्वरितच पोहचू शकतो , या उद्देशाने घोड्यांना युद्धामध्ये विशेष स्थान दिले गेले आहे. घोड्यावर स्वार होऊन एका स्थानावरून दुसऱ्या स्थानावर घोडा जेंव्हा जातो तेंव्हा त्यावर आसनस्थ घोड्याची दिशा निश्चिती करतो. आसनस्थ व्यक्तीचा भार सहन करून घोड्याला धावावे लागते. यासाठी घोड्यांची निगराणी करणे, त्यांचा खुराक व्यवस्थित ठेवणे. युद्धाच्या वेळी कोणाला कोणता घोडा देणे, याचे प्रभावी कौशल्य ज्याला असावे लागते, असा तो अश्वपती. या अश्वपती राजाला एकूण सात मुले आणि एक मुलगी. एकुलती एक मुलगी लाडाची असल्याने तिला कैकय देशाचे नाव प्रदान केले जाईल या विचाराने कैकयी असे ठेवण्यात आल...